Friday, December 21, 2012

२०१३ - सुरूवात एका नव्या वाटचालीची!

गड्यांनो,

या ब्लॉगच्या स्वरूपात थोडा बदल करायचा आहे! नुसताच दिसण्याचा नाही, तर या ब्लॉग मधे प्रसिद्ध होणा-या लेखनाचा ढंगही बदलावा असा यत्न करतो आहे!
Darvaja - Kille Chandan
सह्याद्रीमध्ये वसलेले विविध किल्ले, आधी नुसते बघत होतो... आता हळूहळू जसे वाचन वाढले तसे किल्ले बोलू लागले, थोरा मोठ्यांचा सहवास, त्यांचे लेखन आणि त्या लेखनाचे वाचन या सगळ्यांनी माझे बोट पकडले आणि मीहि त्यांच्या वाटेवर चालू पडलो! या वाटेवर मला जे भावले ते आपल्या समोर मांडावयाचा हा एक यत्न! कधी आपणांस ते माझ्या शब्दांतून सामोरे येईल, तर कधी जे जसे आहे तसे येईल (उदा. कविराज भूषण, कवि कलश, रामचंद्रपंत अमात्य यांचे बरोबरच अनेक मान्यवर इतिहासकारांचे संदर्भ इ.)
किल्ले, द-या - खोरी, खिंडी, हे पाहताना जसे मला सुचले ते मी लिहू लागलो! थोरांसमोर, या विषयातील जाणत्यांसमोर माझे लिखाण वाचता झालो! त्यांचे आशिर्वाद घेऊन लिहीता झालो!
आणि तेच लेखन आता मी आपल्या समोर मांडतो आहे!
यातील जे चूक ते माझे आणि जे काही बरोबर ते सगळे सगळे माझ्या थोरा मोठ्यांचे!

बहुत काय लिहीणे!

हिमांशु डबीर

No comments:

Post a Comment